गांज्याच्या तस्करीत एका महिलासह दाेघांना अटक ! बल्हारपूर पाेलिसांची यशस्वी कामगिरी ! 

0
631

 

चंद्रपूर ✍🏻किरण घाटे – : चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे सातत्याने अवैध दारु विक्रेत्यांवर धडक कारवायां हाेत असतांनाच दूसरी कडे बल्हारपूर पाेलिस विभागाच्या एका पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गांज्याची तस्करी करणां-या तीन आराेपींना काल ताब्यात घेतल्याचे व्रूत्त आहे .अटक करण्यांत आलेल्या आराेपीत चंद्रपूरातील एका महिलाचा समावेश असल्याचे समजते .या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते की रविवार दि. ६जूनला तेलंगणा राज्यातुन एका चार चाकी वाहनाने घटनेतील आराेपी राजुरा- बल्हारपूर मार्गे चंद्रपूरात गांजा आणीत हाेते .परंतु त्या आधीच बल्हारपूर येथील पाेलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे राजूरा बाम्हणी फाट्यावर जवळ सापळा रचुन वाहनासह आराेपींना पकडले .वाहन तपासणीअंती पाेलिसांना अडीच लाख रुपये किंमतीचा गांजा वाहनात आढळुन आला .या प्रकरणात एकंदर चार लाख एक्कावन हजार चारशे चाळीस रुपयाचा माल हस्तगत करण्यांत आला आहे .अधिक चाैकशी पाेलिस करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here